अंधारलेल्या वाटेतून उजेडाच्या मार्गावर....
अंधारलेल्या वाटेतून उजेडाच्या मार्गावर.... अडथळ्याच्या , शर्यतीच्या प्रवासात एक नजर मागे भिरकवून कमावलेल्या-गमावलेल्या , जिंकलेल्या-हरलेल्या , हसविलेल्या-रडविलेल्या आनंद-दुःख सर्वच उत्पन्न-खर्चाचा लेखाजोखा म्हणजे जीवनाचे एक वर्ष.! 💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐 नवी सोनेरी पहाट झगझगता प्रकाश उमेदीच्या लाटेतून पुन्हा एकदा स्वार , त्या दूरवर दिसणाऱ्या समाधानाच्या टोकाला जायचे.! तिथून जेवढे मिळेल तेवढे मला आपलेसे करायचे , मिनिटाला बहात्तर वेळा जगतो पुन्हा असे कित्येक तास जगायचे.! दुनियेकडून प्रत्येक क्षणाला दुनियादारीचे नवीन धडे अनुभवायचे , निघालो एकांतात आणि एकटाच अंधारलेल्या वाटेतून उजेडाच्या मार्गावर..! 💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿 उद्याचे आयुष्य कमीपणा शिकवेल अपमान करेल बाजूला ठेऊन त्यास , गजबजलेल्या आणि गोंधळलेल्या आयुष्याला सावरायचे..! आज संघर्षातून निघतोय उद्या त्यांनाच धन्यवाद करायचे , जीवन हे लढाईचे रणांगण आणि संसाराचे अंगण अश्या सर्वांना जपायचे...!! माझ्या सर्व जिवलगांना मनाच्या...