#शिक्षकदिन :- महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांना समर्पित...
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव गोविंदराव फुले :- एक शिक्षक दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे || भिक्षान्न मागावे || पोटापुरते ||१|| विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे || भिक्षेकरी व्हावे || गावांमध्ये ||२|| स्त्री - पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या || विद्या शिकवाव्या ||भेद नाही || ३ || स्वतः हितासाठी खर्च जे करती || अधोगती जाती || जोती म्हणे || ४ || भारतराष्ट्राच्या शिक्षणाचे जनक म.ज्योतीराव फुले व सावित्री माई फुले यांची महती एका लेखात लिहिता येणार नाही व ती लिहिणे कोणालाही शक्य नसेल एवढा त्याग फुले दाम्पत्यांनी भारताच्या शिक्षणक्षेत्रात केलेला आहे, ज्याची जाणीव महाराष्ट्रातील प्रत्येक सुशिक्षित व गलेलठ्ठ पगार ...