!!!..वेगळीच स्वप्ने होती आम्हां #शिक्षकभरती उमेदवारांची...!!!!


"ज्यांची सुरुवातच निराशाजनक असेल, त्यांचा शेवट कसा आनंददायी होणार?"

"मने जिंकून उंचच उंच झेपावण्याची क्षमता ठेवणारी ही भावी शिक्षक पिढी व त्यांच्या अध्यापनात येणाऱ्या पुढील विद्यार्थी पिढ्या एकाच झटक्यात इथल्या व्यवस्थेने गार करून टाकल्या।"

           

            लाखो  सुशिक्षित डी.एड./ बी.एड धारक बेरोजगार, शिक्षक होण्याची स्वप्ने डोळ्यासमोर ठेऊन ज्यातील मोठा भाग हा माझा गरीब बांधव असून आजही ग्रामीण भागाशी/ खेडेगावाशी/तांडे/वस्त्या शी संबंध ठेवतो. मागील 70 वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्रात माझ्या गावासारखे असे अनेक लहान गावे/वस्त्या/तांडे आहेत जेथे कोणाच्याच बापजाद्यांनी आपल्या वारसांसाठी भौतिक सुख-समाधानासाठी 'इस्टेटी' कमावून ठेवल्या नाहीत. कारण दोन वेळेच्या पोटाची आग विझवण्यासाठी बारा महिने कोणाकडे तरी "चाकरी" करण्यात त्यांची  जिंदगी संपून गेली. झाडांची पाने झोपडीला बांधून त्यावर बांबू किंवा इतर मजबूत लाकडांचा आधार व भिंतीवर "शेणाची थाप" हाच होता पूर्वजांचा बंगला. झोपडीतला संसार कसाबसा एका घरापर्यंत नेण्यासाठी जीवाचे रान करणारे आमचे पूर्वज कधीच संपत्ती कमावू शकले नाही, कारण आयुष्यभराचा "ठलवा" हे विशेषण इथल्या परंपरागत व्यवस्थेकडून याच पूर्वजांना फुकटात मिळालेल होत. याचा प्रत्यक्ष अनुभव या देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या वार्षिक आमदनीच्या भेदभावातून समजून पडते.

    आपले पूर्वज गेले, नवीन पिढी जन्माला आली. मात्र इथली अन्यायकारी व्यवस्था अजूनही तशीच आहे. राज्याची आजची व्यवस्था सांभाळणारे हे जन्मजात सावकार/श्रीमंत/ राजकारणी आहेत, कारण त्यांच्या पूर्वजांकडून त्यांना मिळालेला हा "वारसा" आहे, यांच्यापैकी कोणीही "ठलवा" नाही ही विशेष बाब. परंतु  आजन्म चाकरी करणाऱ्यांची आमची ही पिढी #शिक्षकभरती च्या माध्यमातून आज शिक्षक बनण्यासाठी तयार आहेत. सालामागुन साल निघून गेले तशी शिक्षक होण्यासाठी लागणाऱ्या पात्रतेने सुद्धा आपले रंग बदलविले. 


     यामागचे कारण हेच की आज जगाच्या पावलावर पाउल ठेऊन विद्यार्थी घडविणे, चिमुकल्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन जागृत करणे, त्यांच्या विषयज्ञानाची व्यावहारिक ज्ञानाशी सांगड घालून विद्यार्थ्यांचा शारीरिक,भावनिक,बौद्धिक विकास करणे, विशेषतः विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणे. "कोणत्याही देशाच्या विकासाचा दर्जा हा त्या देशातील शिक्षणाच्या दर्जावर व शिक्षण पद्धतीवर अवलंबून असतो". यामुळे देशाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांचा दर्जा/गुणवत्ता उंचावणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षकाने पारंपारिक ज्ञान,अभ्यासक्रम,अध्यापन पद्धती इ. बरोबरच काळानुरूप आधुनिक  नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, ज्ञान, माहिती, अध्यापन पद्धतीसुद्धा आत्मसात करून आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करून तिच्यामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. 

      एक आदर्श शिक्षक होण्यासाठी लागणाऱ्या विषयाचे प्रशिक्षण आम्ही सर्व उमेदवारांनी डी.एड./बी.एड अश्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून चांगल्या गुणांनी पूर्ण केले. मात्र अन्यायकारी शासन फक्त तेवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पुन्हा TET( शिक्षक पात्रता परीक्षा) नावाची परीक्षा सुरु करून उमेदवारांच्या ज्ञानाची कसोटी घेण्याचे ठरविले, उमेदवारांनी ती सुद्धा उत्तीर्ण करून आमचे ज्ञान आजही अद्ययावत आहे याची जाण शासनाला करून दिली. डी.एड./बी.एड करून वर्षामागे वर्ष निघत गेले, वय वाढत गेले,कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढत गेल्या, मात्र  शासनाला #शिक्षकभरती काही दिसेना. तरीही उमेदवारांनी आशावाद व संयम सोडला नाही, कारण व्यावसायिक अभ्यासक्रमातून या मुल्यांचे शिक्षण उमेदवारांनी घेतले होते.


     व्यवस्था एखाद्याला कशी "बुरून" खाऊ शकते याची प्रचीती उमेदवारांना मागील काही वर्षांमध्ये आली. (सामान्यांच्या भाषेत) राज्याच्या सत्तेचे हस्तांतरण होऊन नवीन सरकारने (विकास)मागील ६६ वर्षांच्या अन्यायाचा दाखला देत २०१४ साली राज्याची गादी मिळविली. व #शिक्षकभरती उमेदवारांच्या माथी पुन्हा एक नवीन परीक्षा TAIT (शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी) मारल्या गेली, जणू काही शिक्षक हे वर्ग-2 चे पद आहे व शिक्षकांना मिळणारे वेतन वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांच्या वेतनाएवढे असेल. भावी शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे सर्वच उमेदवार या परीक्षेला सुद्धा घाबरले नाही, व आपल्या अद्ययावत असलेल्या ज्ञानाचा दाखला देत उत्कृष्ट गुणांची कमाई केली. पण......
      
      आता प्रश्न असा की पुन्हा किती  परीक्षा? 
      आम्ही फक्त परीक्षाच देत राहणार का? 
       रिक्त जागांची आज संख्या किती??? 

 या वरील प्रश्नांचे उत्तर राज्याचे शिक्षणमंत्री श्री विनोद तावडे साहेबांना सुद्धा माहित नाही. कारण त्यांनीच पोकळ घोषणांनी  स्वतःसमोर भरपूर अडचणी निर्माण करून ठेवल्या आहेत......




राज्याच्या शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा देण्याचा शब्द देणाऱ्या मा. शिक्षणमंत्र्यांना शिक्षकांच्या रिक्त पदासंबंधी आजही माहिती कशी नसावी? फक्त 7 दिवसात राज्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती काढू शकतात. पण शेवटी प्रश्न हा मतांचा व राजकारणाचा येतो.पवित्र मानल्या जाणारे शिक्षणक्षेत्र हे सुद्धा व्यवस्थेच्या राजकारणातून सुटले नाही. बेरोजगार भावी शिक्षकांच्या भावनेशी व त्यांच्या हलाखीच्या परिस्थिती शी शासनाचा आज लपंडावाचा खेळ सुरु आहे.


🔷शासनाच्या राजकारणात संस्थाचालकांची भूमिका :-

          याच व्यवस्थेच्या राजकारणाची दुसरी बाजू संस्थाचालक आहे. सामान्य बेरोजगार भावी शिक्षकांची गळचेपी करण्यात राज्यातील संस्थाचालकांचा सिंहाचा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही। मागील कित्येक वर्षांपासून 8-10 लाख रुपये (आज 10-15 लाख रुपये) घेऊन स्वतःचे पोट वाढविणारे हे संस्थाचालक आज #शिक्षकभरती उमेदवारांची मुलाखत स्वतः घेऊन भरती करण्याची परवानगी मिळावी म्हणून न्यायालयाच्या दारावर उभे आहे व शासनाचे वकील त्यांची शासनाच्या वतीने अप्रत्यक्ष मदत करत आहेत। (#निवडणूक_निधी_2019) कारण राज्यातील कोणत्याही शिक्षणसंस्थेत मुलाखतीच्या नावाखाली उमेदवारांचे आर्थिक शोषण होऊन शासन व संस्थाचालक यांचाच फायदा होणार आहे. म्हणजे शासन व संस्थाचालक यांनी संगनमताने केलेल्या  पापाचे प्रायश्चित गुणवंत उमेदवारांनी करावे ही आजच्या व्यवस्थेची मानसिकता आहे. त्याचाच एक पुरावा म्हणजे 31 ऑगस्ट 2018 चा शासन निर्णय ↓↓


 शिक्षकभरतीच्या नावाखाली बोगस उमेदवारांकडून लाखो रुपये लुटणाऱ्या संस्थाचालकांच्या पापात, महाराष्ट्र शासनाचा संबंधित विभाग व अधिकारी अर्ध्या हिश्याचे भागीदार आहे असे म्हटले तर चूक ठरणार नाही. कारण खाजगी संस्थेत  शिक्षकांची भरती शासनाच्या परवानगीशिवाय होऊच शकत नाही. म्हणजे इकडे लाखो रुपये लुटून बोगस शिक्षकांची भरती करायची व जेव्हा अतिरिक्त झाले तर त्यांचे समायोजन स्थानिक स्वराज्य संथेच्या शाळेत करून घ्यायचे."हाक ना बोंब, तेरी भी चूप और मेरी भी चूप"कोटी कोटी रुपयांची माया गोळा करूनही संस्थाचालक सन्मानाचे हक्कदार कसे होऊ शकतील? शासनाच्या मदतीने संस्थाचालकांचा हा गोरखधंदा सर्व जनतेला मुकपाठ आहे, फक्त खुद्द शासन यापासून अनभिज्ञ आहे. म्हणजे गुणवत्ता घेऊनही आम्ही आजन्म "चाकरी" करणाऱ्यांची पिढी आजही "ठलवा" म्हणूनच जगावे हीच या व्यवस्थेची नीती आहे।

यालाच म्हणतात एखाद्याला व्यवस्थेकडून "बुरुन" खाणे।

               "करायचे घोटाळे मिळून करूया,
             तू किती मी किती आधीच ठरवूया !
         गृहीत नको धरायला इथले खरे मालक,
     यांच्याच कष्टाने आपण आपली पेटी भरूया !!"


        "ज्यांची सुरुवातच निराशाजनक असेल,
         त्यांचा शेवट कसा चांगला होणार?"

        संकलन:- 📖✒️ विष्णू सर, तुकाराम गिरी सर, पुनम गवांदे मॅडम, अनुराग गडेकर सर  





Comments

  1. स्वप्नांच्या पूर्ततेसाठी भावी गुणवंत बेरोजगारांची संघर्षगाथा मांडणारा अप्रतिम लेख 👌👌👌

    स्वप्न इवलेसे उरी बाळगलेले
    संघर्षातही हास्य फुललेले
    प्रखर उन्हातही नेहमी बहरलेले
    स्वप्न इवलेसे उरी बाळगलेले


    वर्षानुवर्षे अधुरेच राहीलेले शिक्षक बनण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरावे एवढीच अपेक्षा

    ReplyDelete
    Replies
    1. मनस्वी आभार मॅडम💐🙏🏼🙏🏼

      Delete
  2. वास्तव शब्दांकन!!!

    माननीय नामदार विनोदजी तावडे साहेब बेस्ट प्लेअर या बेस्ट गेमर!!

    खुप स्वप्न आहेत माझ्या सहकारी भावी शिक्षकांची.

    कोण म्हणत शिक्षक होत नाय !!! अरे झाल्याशिवाय राहत नाही !!!
    लढणार शेवटपर्यंत

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच वास्तवाची जाणीव करून देणारा लेख आहे!
      आता तरी याची कोणी दखल घेणार आहे का?

      D.ed B.ed करणारा उमेदवार हा सामान्य घरातीलच असतो, त्याला परिस्थिती ची जाणं असते.

      #शिक्षकभरती एक दिवास्वप्न तर नाही ना!

      Delete
    2. धन्यवाद सर🙏🏼💐

      Delete
  3. व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा अप्रतिम लेख सर 👌👌.
    .

    ReplyDelete
  4. और यहां पर मॅन ऑफ द मैच के प्रबल दावेदार तावड़े जी .... अंपायर भी वही और प्लयेर भी वही..

    ReplyDelete
    Replies
    1. सही कहा भाई,👍💐
      अगर हमारी आँखे खुली हुई तो पुरी दुनिया हम देख सकते हैं। 💐🙏🏼🌿

      Delete
  5. शिक्षक होऊ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील भावना व तेवढ्याच ताकतीने नम्रमपणे शासनाला चपराक देणारा लेख
    अप्रतिम!!!!!!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद सर💐🌿🙏🏼

      Delete
  6. Khup Chan bhutkal samor ubha rahila

    ReplyDelete
    Replies
    1. भूतकाळातील (शहरात वर्तमानपत्र वाटून शिकण्याचे) दिवस आठवले की आजही डोळ्यात अश्रू येते सर। 💐🙏🏼

      Delete
  7. बेरोजगार डीएड बिएड बांधवाच्या सर्व भावना या लेखातुन स्पष्ट करणारा अप्रतिम लेख**सलाम👏

    ReplyDelete
    Replies
    1. प्रत्येक डीएड/बीएड धारकांच्या समस्या जवळपास याच आहेत सर। धन्यवाद💐🙏🏼

      Delete
  8. अप्रतिम लेख,,,,8 वर्ष शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील मांडलेल्या सत्य भावना ।।

    ReplyDelete
  9. खरोखरच अप्रतिम लेख!!!बेरोजगार डीएड बी एड विद्यार्थ्यांचा संघर्षच याद्वारे व्यक्त झाला आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. अपेक्षा आहे की #शिक्षकभरती परिवारातील प्रत्येक सदस्य आपला भूतकाळ येथे नक्कीच आपल्या शब्दांत शासनाला दाखवेल।💐🙏🏼

      Delete
  10. एका क्रांतीची नांदी आहे.

    ReplyDelete
  11. वास्तवदर्शी लेख👌👌

    राजकारण्यांनो शिक्षक तर आम्ही होणारच..आणि तुम्हालाही धडा शिकवणारच..

    घोडा - मैदान जवळच आहे👍

    ReplyDelete
  12. The government should think about d people who r awaiting for d recruitment.

    ReplyDelete
  13. खूप सूंदर अनुराग सर...

    ReplyDelete
  14. तावडे च्या कानाखाली शेकली...वास्तवदर्शी

    ReplyDelete
  15. Very nice post . https://bhaskarjobs.com/page/34/

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अंधारलेल्या वाटेतून उजेडाच्या मार्गावर....

#शिक्षकदिन :- महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांना समर्पित...