#शिक्षकदिन :- महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांना समर्पित...
राष्ट्रपिता महात्मा जोतीराव गोविंदराव फुले :- एक शिक्षक
दरिद्री मुलांनी विद्येस शिकावे || भिक्षान्न मागावे || पोटापुरते ||१||
विद्वान वृद्धांनी विद्यादान द्यावे || भिक्षेकरी व्हावे || गावांमध्ये ||२||
स्त्री - पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या || विद्या शिकवाव्या ||भेद नाही || ३ ||
स्वतः हितासाठी खर्च जे करती ||अधोगती जाती || जोती म्हणे || ४ ||
भारतराष्ट्राच्या शिक्षणाचे जनक म.ज्योतीराव फुले व सावित्री माई फुले यांची महती एका लेखात लिहिता येणार नाही व ती लिहिणे कोणालाही शक्य नसेल एवढा त्याग फुले दाम्पत्यांनी भारताच्या शिक्षणक्षेत्रात केलेला आहे, ज्याची जाणीव महाराष्ट्रातील प्रत्येक सुशिक्षित व गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या किमान महाराष्ट्र शासनाच्या पगारदार नोकरांनी ठेवणे अपेक्षित आहे. हे तेच फुले दाम्पत्य आहेत, ज्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वतःला शासनाचे वर्ग 1 किंवा वर्ग 2 चे अधिकारी आणि कर्मचारी म्हणवून घेऊन निरर्थक अभिमान बाळगतो, पण ज्यांनी हे दिवस आपल्याला दाखवले त्यांना मात्र आपण नक्की विसरतो.
"शिक्षणाच्या उपकाराची परतफेड करताच येत नाही, तर त्या उपकाराची जाणीव जीवनभर मनात असावी लागते"
आज संपूर्ण भारत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त #शिक्षकदिन पाळण्यात व्यस्त आहेत, खासकरून आमचे शिक्षक बांधव. मला स्वतःला सुद्धा एक सुशिक्षित बेरोजगार व भावी शिक्षक म्हणून (महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभाग ने स्वप्न दाखविल्या प्रमाणे) व्यक्त होण्याचा अधिकार आहे....!
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।
म.फुले यांच्या कारकिर्दीत भारताची शिक्षण व्यवस्था ही रूढी,परंपरेप्रमाणे ठराविक व काहीच घटकांसाठी मर्यादित होती हे आज जगमान्य आहे, त्या विरोधात जाऊन म. फुले व माई सावित्री यांनी भारताच्या शिक्षण क्षेत्रात एक नवीन क्रांती केली हे आपल्याला विसरून चालणार नाही व त्या वेळी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म सुद्धा नव्हता. देशाचे स्वातंत्र्योत्तर दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख असली तरीही, ठराविक सामाजिक/धार्मिक रीती-रिवाजांविरोधात प्रामाणिकपणे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणल्यामुळे शेणाचे शिंतोडे स्वतः खाणारे फक्त फुले दाम्पत्य होते. असंख्य जातीय/धार्मिक भेदभावाच्या अडचणीत राहूनही त्यांनी शिक्षण क्षेत्रात नवीन सूर्योदय उजाडला, हेच आपले आजचे सौभाग्य मानावयास काहीच हरकत नसावी.
म.जोतिबा फुले यांनी शिक्षणाची दारे ज्या खडतर परिस्थितीतून खुली करून दिली होती, आज त्याच शाळांची दारे ही व्यवस्था बंद करण्याच्या मार्गावर आहे। शिक्षकदिनानिमित्त पुन्हा एकदा त्याच व्यवस्थेकडून एकच अपेक्षा, लेकरांचे शिक्षण व त्यांची शाळा बंद करू नका, त्यांचा मोफत शिक्षण घेण्याचा अधिकार हिरावून घेऊ नका। शिक्षण असेल तरच जगण्याला व आयुष्याला किंमत आहे।
#शिक्षकदिन निमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा जोतीराव फुले व सावित्री माई फुले यांना मानाचा मुजरा।
💐🙏🏼🌿💐🙏🏼🌿💐🙏🏼🌿💐🙏🏼🌿💐🌿🙏🏼💐

खरंच आहे
ReplyDeleteवास्तविकता लिहली 👏👏👏👏👏
ReplyDeleteJMT's JCM | Casino - Missouri Gaming Commission
ReplyDeleteJMT 경상남도 출장샵 Casino 양주 출장마사지 익산 출장마사지 JMT is 고양 출장안마 the only legal and licensed gaming operator in Missouri with an online gaming 아산 출장안마 license issued by the Missouri Gaming Commission and