अंधारलेल्या वाटेतून उजेडाच्या मार्गावर....


अंधारलेल्या वाटेतून उजेडाच्या मार्गावर....

अडथळ्याच्या,शर्यतीच्या प्रवासात एक नजर मागे भिरकवून कमावलेल्या-गमावलेल्या,जिंकलेल्या-हरलेल्या,हसविलेल्या-रडविलेल्या आनंद-दुःख सर्वच उत्पन्न-खर्चाचा लेखाजोखा म्हणजे जीवनाचे एक वर्ष.!
💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐
नवी सोनेरी पहाट झगझगता प्रकाश उमेदीच्या लाटेतून पुन्हा एकदा स्वारत्या दूरवर दिसणाऱ्या समाधानाच्या टोकाला जायचे.!
तिथून जेवढे मिळेल तेवढे मला आपलेसे करायचे,मिनिटाला बहात्तर वेळा जगतो पुन्हा असे कित्येक तास
 जगायचे.!
दुनियेकडून प्रत्येक क्षणाला दुनियादारीचे नवीन धडे अनुभवायचे
निघालो एकांतात आणि एकटाच अंधारलेल्या वाटेतून उजेडाच्या मार्गावर..!
         💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿
उद्याचे आयुष्य कमीपणा शिकवेल अपमान करेल बाजूला ठेऊन त्यास,गजबजलेल्या आणि गोंधळलेल्या 
आयुष्याला सावरायचे..!
आज संघर्षातून निघतोय उद्या त्यांनाच धन्यवाद करायचे,जीवन हे लढाईचे रणांगण आणि संसाराचे अंगण अश्या सर्वांना जपायचे...!!
माझ्या सर्व जिवलगांना मनाच्या गाभाऱ्यात ठेवायचे याच आशेतून,
निघालो एकांतात आणि एकटाच अंधारलेल्या वाटेतून उजेडाच्या मार्गावर....!!
         💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐
अंथरलेल्या पांघरलेल्या उशाला पायशाला हवा चार भिंतीचा आडोसा, एक सोबतीला सहकारी कठीण जीवनाचा प्रवास सहज करायचे..!!
हक्काची रोटी आण हक्काच पाणी दोघांच्या स्वप्नांना मिळून जगवायचे,थकलेल्या शरीराला विश्रांती आणि संसाराचा गाडा मिळून ओढायचे...!!
आज डोळ्यासमोर स्वप्नांचे उद्यान व हिरवीगार बाग बघून  
निघालो एकांतात आणि एकटाच अंधारलेल्या वाटेतून उजेडाच्या मार्गावर....!!
 💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿💐🌿

 सर्वाना नवीन वर्ष सुख-समाधानाचे आनंदाचे व आरोग्याचे लाभो हीच शुभेच्छा।
                       💐🌿🙏💐🌿🙏💐🌿

  
              संकलन
               अनुराग गडेकर
                             @AnuragGadekar 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

#शिक्षकदिन :- महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले यांना समर्पित...